ठाकरे गटात पून्हा होणार भूकंप, शिंदे सेनेच्या 'या' नेत्यानं केलं सूचक वक्तव्य

Published : Jun 17, 2026, 09:15 PM IST
Uddhav Thackeray

सार

उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार नवीन गट स्थापन करून शिंदे सेनेत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दावा केला आहे की, भविष्यात ठाकरे गटातील मोठे नेते आणि आमदारही त्यांच्या पक्षात प्रवेश करतील.

शिंदे गट खासदारांपाठोपाठ आता आमदार घेऊन जाणार का अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा आता नवीन गट स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर हा गट लवकरच शिंदे सेनेला जाऊन मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हि फूट टाळण्यात यावी म्हणून उद्धव ठाकरे गटाने तातडीची बैठक बोलवली आहे.

ठाकरे यांना बसणार दुसरा धक्का 

उद्धव ठाकरे यांना आता दुसरा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतचा दावा नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे. भविष्यात ठाकरे यांच्या [पक्षातील मोठे नेते आमच्या पक्षात येतील असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्यांचे नेते आहेत. त्यामुळं पक्षात प्रवेश होत असल्याचं कल्याणकर यांनी म्हटलं आहे.

नेमकी काय माहिती आली समोर 

याबाबतची माहिती आपण आता समजून घेणार आहोत. नागेश पाटील आले तर त्यांचे स्वागतच करू. ते पक्षात आल्यानंतर पक्ष वाढेल, संघटन वाढेल असा दावा यावेळी बालाजी कल्याणकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक असून त्यांच्याकडे जायला वेळ घ्यावी लागत नाही असं बाबुराव पाटील कोहोळीकर म्हटलं आहे.

शिंदे साहेबांनी राजीनामा द्यायला... 

शिंदे साहेबांनी जर मला राजीनामा द्यायला सांगितला तर मी राजीनामा देईल असं कोहोळीकर यांनी म्हटलं आहे. एकनाथ भाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं यावेळी बोलताना कोहोळीकर बोलले आहेत. आता भविष्यात कोणकोणती राजकीय गणित बदलतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक