महाराष्ट्रातला पाऊस उघडला, हवामान विभागाचा अंदाज घ्या जाणून

Published : Jul 11, 2026, 08:30 PM IST
mumbai heavy rain imd red alert waterlogging vasai virar ghatkopar local trains monsoon

सार

राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत पावसाने उघडीप दिल्याने आणि काही ठिकाणी अजूनही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात पावसाचा जोर सध्या मोठ्या प्रमाणावर काही दिवसांपासून वाढला होता. आता पाऊस ओसरल्यामुळं तुरळक ठिकाणी हलक्यासरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांची यामुळं चिंता काहीशी वाढलेली दिसून आली आहे. काही भागात अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पाच दिवसांचा अंदाज हवामान विभागानं सांगितला 

पाच दिवसांचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी, नंदुरबार, धुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पाऊस उघडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

रविवारी पाऊस उघडणार 

रविवारी पाऊस उघडणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सोमवारी पूर्व विदर्भ आणि भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उरलेल्या राज्यात पावसाच्या उघडीच अंदाज वर्तवला आहे. बुधवारी विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई आणि पुण्यात होता पावसाचा जोर 

मुंबई आणि पुणे येथे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर होता. या ठिकाणी नागरिकांची प्रवास करताना तारांबळ उडालेली दिसून आली. मुंबईत नागरिकांच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं होतं. आळंदीत पुलावरून पाणी गेल्यामुळं दिंडीच्या प्रस्थानाला उशीर झाला. आता पाऊस थांबल्यामुळं नागरिक निश्चित झाले आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक