राष्ट्रवादी काँग्रेस विलीन? राजकारणात मोठा भूकंप; काँग्रेस पक्षात काय चाललंय?

Published : Jun 12, 2026, 11:56 PM IST
congress

सार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपशी लढण्यासाठी लहान पक्षांनी मोठ्या पक्षात विलीन व्हावे असे सुचवले. यानंतर, नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील राजकारण सध्याच्या घडीला मोठ्या वेगानं बदलत चाललं आहे. या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. महाराष्ट्रात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येईल असं सांगण्यात आलं, पण हे खरं आहे का यामागची सत्यता आपण तपासून पाहायला हवी. त्याबाबत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहेत.

नेमकं काय झालं? 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी एक विधान केलं आणि त्यामुळं सगळीकडं चर्चा सुरु झाली. राऊत यांनी बोलताना म्हटलं की, एका मोठ्या पक्षात बाकी पक्षांनी विलनीकरण करायला हवं. त्यामुळं नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याशी लढणं सोपं होईल. यावेळी त्यांनी काँग्रेसपासून वेगळ्या झालेल्या पक्षांनी परत त्या पक्षात यायला हवं असं म्हटलं.

काय केलं वक्तव्य?

त्यांच्या या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली. यावेळी नाना पटोले यांच्या विधानामुळं परत एकदा वादाला सुरुवात झाली. नाना यांनी बोलताना टीएमसी आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. हि प्रोसेस राष्ट्रीय पातळीवर सुरु असून ती लवकरच पूर्णत्वास जाईल असं म्हटलं. त्यामुळं एकच खळबळ उडाली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

FDA Crackdown: मुंबई-पुण्यात FDA चा धडाका! हॉटेल, डार्क स्टोअर्सवर कारवाईचा बडगा
Palghar News : पालघरमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून दादागिरी, शिंदेंचा मोठा दणका; ७ शिवसेना पदाधिकाऱ्यांचं निलंबन