राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? राजकीय चर्चांना उधाण

Published : Jun 12, 2026, 07:30 PM IST
sharad pawar

सार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याला सकारात्मकता दर्शवली असून, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी अंतिम निर्णय शरद पवार घेतील असे स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचं राजकारण परत एकदा ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार असल्याच्या चर्चाना सुरुवात झाली आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून त्याबद्दल नेमकं काय काय घडलं आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

काय म्हणाले नाना पटोले? 

नाना पटोले यांनी यावेळी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी समान विचारांच्या पक्षांनी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत शरद पवार आणि इतर नेते निर्णय घेऊ शकतात अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. या वक्तव्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचं खरंच विलानीकरण होणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया 

यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पक्षाची भूमिका शरद पवार ठरवतील आणि सध्या अशा चर्चांवर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे विलिनीकरणाबाबत अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

रोहित पवार यांचे वक्तव्य आले चर्चेत 

रोहित पवार यांचे वक्तव्य यावेळी परत एकदा चर्चेत आले आहे. देशहित आणि व्यापक राजकीय हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चाना परत एकदा पक्ष फुटतो की त्याच विलनीकरण होत याबद्दल सर्वांना संशय वाटत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Fadnavis on Congress : 'काँग्रेस बुडतं जहाज, त्यात कोण बसणार?', राऊतांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
Tukaram Mundhe l FDA चा असा गैरवापर अजून कुणीही केलेला नव्हता, महिलेची चालाखी पण…