Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या टीमने बेंगलोर अय्यंगार बेकरीवर टाकली धाड, घाण पाहून डोकं होईल बधिर

Published : Jul 18, 2026, 04:17 PM IST
Tukaram Mundhe

सार

तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी लातूरच्या रेणापूर येथील 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर धाड टाकली. या धाडीत मुदत संपलेला कच्चा माल आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ बेकरीचा परवाना रद्द करून तिला टाळे ठोकले.

लातूर: तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रात धाड टाकत धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी' वर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीमुळं संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल मालक घाबरून गेले आहेत. या हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना अतिशय गलिच्छपणा या ठिकाणी आढळून आला.

मुदत संपलेला कच्चा माल होते वापरत 

बेकरीमध्ये मुदत संपलेला कच्चा माल वापरला जात होता. यावेळी हाच माल वापरून बेकरीचे पदार्थ बनवत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. या बेकरीमध्ये सगळीकडं घाण पसरलेली होती. या अस्वच्छ वातावरणामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या बेकरीची परिस्थिती बघितल्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली.

बेकरीचा परवाना केला रद्द 

हॉटेलमधील घाण बघितल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचा परवाना रद्द केला. तसेच तात्काळ या बेकरीला टाळे ठोकण्यात आलं. त्यानंतर या बेकरीला बंद केलं असून दुकान तात्काळ बंद करण्यात आलं. या बेकरीवर कारवाई केल्यामुळं आजूबाजूच्या हॉटेल मालक घाबरले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Kumbh: कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार, हे सरकार फार काळ टिकणार नाही; राऊतांचा मोठा दावा
Maratha Reservation: ५८ लाख नोंदींचा मुद्दा पुन्हा पेटला; जरांगे पाटील आजपासून उपोषणावर