खाद्यतेलाबाबत तुकाराम मुंडे काय म्हणाले, वाचून व्हाल शॉक

vivek panmand   | CMS
Published : Aug 20, 2026, 08:06 PM ISTUpdated : Aug 20, 2026, 09:02 PM IST
tukaram munde

सार

तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना सुट्टे तेल खरेदी न करण्याचा सक्त इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, भेसळयुक्त तेलामुळे उच्च रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात, जे विशेषतः बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.

तुकाराम मुंडे हे परत एकदा त्यांच्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी यावेळी तेलावर कडक शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी मार्केटमध्ये असलेलं सुट्टे तेल खरेदी न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. आपण पॅकबंद तेल जरी खरेदी करत असलो तरी त्याची खातरजमा करून घ्यावी अशी सूचना मुंडे यांनी दिली.

भेसळयुक्त तेलांमुळं आरोग्याचे होतात प्रॉब्लेम 

भेसळयुक्त तेल आहारात प्रॉब्लेम उपस्थित राहतात असं यावेळी तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे. गंजलेल्या किंवा खराब डब्यांमधून शिसे तेलात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळं बालकांच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला उच्च रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार उदभवू शकतात.

या क्रमांकाचा करा वापर 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अन्न विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे. आपल्याला अन्नाशी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800-222-365 या क्रमांकावर संपर्क साधायला सांगितलं आहे. आपण तेलाची खरेदी करताना काळजी घ्यावी. भेसळयुक्त तेलामुळ आपल्याला आजार उदभवण्याची शक्यता असते.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'