नारायण राणे यांचं नाव सुचवल्यावर धमक्या आल्या, या नेत्यानं केली मोठी घोषणा

vivek panmand   | CMS
Published : Aug 20, 2026, 04:53 PM IST
Narayan Rane

सार

दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे की, नारायण राणेंच्या खासदारकीसाठी त्यांनीच सर्वप्रथम नाव सुचवले होते, ज्यामुळे त्यांना धमक्या आल्या. मंत्रीपद नसले तरी आपण समाधानी असून, राणेंच्या आग्रहामुळेच निवडणूक जिंकल्याचेही त्यांनी सांगितले.

नारायण राणे हे कायमच चर्चेत राहत असतात. खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवणारा मी पहिला व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सुचवताच मला धमक्या आल्या होत्या. दीपक केसरकर यांनी यावेळी हा गौप्यस्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात आता यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. यावेळी केसरकर यांनी नारायण राणे यांना तिकीट मिळावं म्ह्णून प्रयत्न केलं होतं.

काय म्हणाले केसरकर? 

नारायण राणे यांनी तिकीट मिळावं म्हणून मी सर्वात आधी आवाज उठवला होतो. राणे साहेबांचं निवडणुकीला उभं राहण्याचं ठरलेलं नव्हतं. परंतु जे लोक इच्छुक होते त्यांनी मला धमक्या दिल्या. राणे यांचं नाव सुचवल्यामुळं राग आलं होतं. त्या धमक्यांचे व्हाट्स अँप चॅट माझ्याकडे होते. ते डिलीट झाले आणि तुम्ही मंत्री असणार नाही अशा मला धमक्या दिल्या.

मंत्री झालो नाही तरी… 

मनात असेल तर तर करायचं असतं. मी मंत्री नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चांगलं चालू आहे. देवाच्या कृपेनं आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं मी आता मंत्री नसणं हे कदाचित साईबाबांच्या मनात नसेल. सावंतवाडीची जनता म्हणजे माझं कुटुंब आहे. राणे यांनी केलेल्या आग्रहामुळं मी निवडणूक लढवून जिंकून आलो.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'