मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर कॉमेडियन बनले असते, मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंना असं का म्हणाले?

Published : Jul 10, 2026, 05:34 PM IST
devendra fadanvis pics

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे आमचे मित्र असून त्यांच्यापासून राजकीय धोका नाही, असे म्हणत फडणवीसांनी त्यांना 'सुपारीबाज' म्हटले आणि त्यांच्या मिमीक्री कौशल्यावरही टोला लगावला.

मिसिंग लिंक पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट झाल्याचं दिसून आलं. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलं होत. यावर बोलताना राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांनी परत ठाकरे यांच्यावर पलटवार करून त्यांना सुपारीबाज असं म्हटलं आहे.

फडणवीस राज ठाकरे यांना काय म्हणाले? 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना यावेळी म्हटलं आहे की, मी हिंदीमध्ये बोललो तर त्यांना राग आला. मी वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते त्यांना समजायला लागले. पूर्ण भाषा मराठीतच केलं पण मला काही अडचण नाही ते आमचे मित्रच आहेत. ते मित्र असल्यामुळं आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही.

आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही 

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ते आमचे मित्र असल्यामुळं आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. मला काही अडचण नाही ते आमचे मित्र आहेत. ते मित्र असल्यामुळं राजकारणात तर आम्हाला त्यांच्यापासून धोका नाही. ते जर मिमीक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर त्यांच्यामुळं स्टँडअप कॉमेडीला करणाऱ्यांचं मार्केट संपल असत असं त्यांनी म्हटलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक