
सध्याच्या घडीला राजकारणात कधी काय घडेल त्याबद्दल आपण सांगू शकत नाही. मिसिंग लिंक बंद झाल्यामुळं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. याबद्दल बोलताना शिंदे यांनी इंजिनिअरिंग मार्व्हलच बेस्ट काम म्हणून आपण मिसिंग लिंकबद्दल बोलायला हवं असं म्हटलं आहे. त्यांनी मी रस्ता दुरुस्तीच्या वेळेला संपर्कात होतो असं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे की, मिसिंग लिंक पडला म्हणजे नेमकं काय झालं ते आपण सर्वात आधी समजून घ्यायला हवं. इथं असणारी कमान सर्वात आधी पडली. जगामधील सगळ्यात लांबचा टनेल म्हणून या मिसिंग लिंकची ओळख तयार झाली आहे. इथं काम करणाऱ्या कामगारांना त्रास झाला. इथं हवेचा वेग होरा, त्यामुळं अनेक कामगार जॉब सोडून गेले.
मी तुम्हाला सांगतो कि मिसिंग लिंकला काहीही झालेलं नाही. मी मिलिंद नार्वेकर यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी खरं बोलायची हिंमत दाखवली आहे. या लिंकबद्दल विरोधक टीका करत आहेत. त्यावर आपण टीका केली म्हणजे ती देशाची बदनामी होत आहे. कुठल्याही प्रकल्पाबद्दल आपण बोलायला लागलो तर ती आपल्या भागाची बदनामी होत असते.