नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस तुमचं मत कोणाला, अमृता फडणवीस यांचं उत्तर ऐकून व्हाल चकित

Published : Nov 10, 2025, 12:05 PM IST

गायिका आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान यांच्याबद्दल आपली मते व्यक्त केली, तसेच त्यांच्या आगामी नवीन गाण्याची घोषणाही केली.

PREV
16
नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस तुमचं मत कोणाला, अमृता फडणवीस यांचं उत्तर ऐकून व्हाल चकित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. त्या अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत असतात. त्यांना गायिका म्हणून ओळखलं जातं.

26
सोशल मीडियावर गाणी झाली व्हायरल

सोशल मीडियावर अमृता यांची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. त्यांनी नुकतीच कर्ली टेल्स या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी वर्षा बंगला आणि तिथलं किचन दाखवलं आहे.

36
नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस कोणाला देणार मत?

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणाला मत देणार यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी यावेळी मोदी यांचं कौतुक केलं आहे. यावेळी मी त्यांच्याशी संवाद साधू शकले नाही.

46
त्यांच्याशी जास्त संवाद साधू शकले नाही

नरेंद्र मोदी यांच्याशी मी जास्त संवाद साधू शकले नाही. ते प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांची मी अगदी एका वाक्यात पटकन उत्तर देत असायचे. मला खूप जास्त दडपण आलं होतं. मला घाम फुटला होता, मी त्यांची फॅन आहे.

56
शाहरुख खान की सलमान खान

पुढे त्यांना शाहरुख खान की सलमान खान या दोघांपैकी एका अभिनेत्याची निवड करण्यास सांगितलं. यावर मिसेस मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की, शाहरुखच नाव त्यांनी घेतलं आहे.

66
२२ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानसोबत स्टेज करणार शेअर

२२ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानसोबत स्टेज शेअर करणार आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांनी यावर्षी दिवाळीत त्यांचं कोई बोले राम राम हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories