आता थंडी सहन करावीच लागेल! पाऊस गेला, राज्यात पारा इतका घसरला की... उद्यापासून 'या' ६ जिल्ह्यांत 'गारठा' वाढणार!

Published : Nov 09, 2025, 10:26 PM IST

Maharashtra Winter Alert: महाराष्ट्रात पाऊस संपल्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यताय. हवामान विभागाने १० नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान घसरण्याचा अंदाज वर्तविला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात कडाक्याचा गारठा जाणवणार आहे.

PREV
18
हाहाकार! पाऊस संपताच राज्यात थंडीची 'सुनामी'

मुंबई: महाराष्ट्रात आता हवामानाने स्पष्ट कलाटणी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थंडीची चाहूल आता गारठ्यात बदलत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १० नोव्हेंबर पासून राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आणि शेतकऱ्यांनी पिकांसाठी विशेष काळजी घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

28
कोणत्या शहरात किती थंडी? (१० नोव्हेंबरसाठीचा अंदाज)

संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण अनुभवता येईल.

प्रदेश शहर कमाल तापमान किमान तापमान अंदाज

पश्चिम महाराष्ट्र पुणे ३१°C १४°C कडाक्याचा गारठा

मराठवाडा (सर्वाधिक) छत्रपती संभाजीनगर ३१°C ११°C थंडीचा मोठा तडाखा

विदर्भ नागपूर २८°C १४°C कोरडे आणि थंड

मुंबई मुंबई ३४°C १८°C दिवसा उष्ण, रात्री गारवा 

38
१. किनारपट्टीवरील 'उष्ण आणि कोरडा' बेल्ट

१० नोव्हेंबर रोजी कोकणातील ६ जिल्ह्यांमध्ये - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग - हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४°C आणि किमान तापमान १८°C पर्यंत खाली येऊ शकते. 

48
२. मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये थंड आणि कोरडे वातावरण राहील. विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान ११°C पर्यंत खाली घसरल्याने थंडीचा जोर सर्वाधिक जाणवेल. 

58
३. मध्य आणि उत्तर महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यांत निरभ्र आकाशामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरेल. पुण्याचे किमान तापमान १४°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

68
४. विदर्भातही थंडीची हजेरी

विदर्भातील नागपूर शहरात कमाल तापमान २८°C तर किमान तापमान १४°C पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

78
नागरिकांसाठी सूचना आणि कृषी विभागाचे आवाहन

संपूर्ण राज्यात दिवसा उन्हाची तीव्रता जाणवेल, मात्र रात्री आणि पहाटेच्या वेळेत गारठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.

88
शेतकऱ्यांसाठी खास सूचना

कृषी विभागाने वाढत्या गारठ्याच्या पार्श्वभूमीवर तूर पिकाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories