Weather Update : राज्यात हवामानाचा लहरी खेळ; थंडी ओसरली, पावसाचा इशारा कायम

Published : Jan 23, 2026, 09:24 AM IST
Weather Update

सार

Weather Update : राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला असून थंडी ओसरत असतानाच पावसाची शक्यता कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून, भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

Weather Update : राज्यात हवामानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यातही पावसाची शक्यता कायम असून, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होताना दिसत आहे. हवामानातील या अचानक बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.

थंडी कमी, तापमानात वाढ

राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडीचा गारठा ओसरला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मात्र सध्या अनेक ठिकाणी किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातून थंडी गायब झाल्याचं चित्र दिसत आहे.

पुण्यात उकाड्याची वाढ

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून उकाडा वाढला आहे. दोन दिवसांत किमान तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली असून कमाल तापमानात दोन अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी, कडाक्याच्या थंडीनंतर आता पुणेकरांना उकाड्याचा त्रास जाणवू लागला आहे.

पावसाचा मोठा इशारा; ढगाळ वातावरण कायम

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे.

जानेवारीतही पावसाची हजेरी

देशातून मॉन्सून परत जाऊन काही महिने झाले असले तरी अनेक भागांत अद्याप पाऊस सुरू आहे. राज्यातही जानेवारी महिना संपत असताना पावसाची हजेरी लागणे हे असामान्य मानले जात आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांतही राज्यातील हवामानात बदल होत राहण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tourist Spots Near Pune : केवळ 1000 रुपयांमध्ये जा फिरायला, पुण्याजवळची 30 प्रसिद्ध पर्यटन स्थळे, लॉन्ग विकेंड करा सेलिब्रेट
Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी शाळांना अर्धा दिवस सुट्टी; भोसरीतील 6 हजार कंपन्या बंद, वाहतुकीत मोठे बदल