Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी शाळांना अर्धा दिवस सुट्टी; भोसरीतील 6 हजार कंपन्या बंद, वाहतुकीत मोठे बदल

Published : Jan 22, 2026, 07:59 PM IST
traffic changes

सार

Pune Grand Challenge Tour : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील सुमारे 6 हजार कंपन्यांना सुट्टी जाहीर केली. 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 23 जानेवारी) होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील सुमारे 6 हजार कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुणे शहरातील शाळा दुपारी 12 नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भोसरी एमआयडीसीतील 6 हजार कंपन्या राहणार बंद

ही सायकल शर्यत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, यशवंतनगर, टेल्को रोड आणि स्पाईन सिटी चौक या मार्गावरून जाणार आहे. या भागात वाहतुकीवर ताण येऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने कंपन्यांना शुक्रवारी सुट्टी देण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुमारे 6 हजार लघु व मध्यम उद्योग बंद राहणार आहेत. तसेच, महावितरणने गुरुवारी नियोजित असलेले देखभाल-दुरुस्तीचे (लोडशेडिंग) काम शुक्रवारी हलवले आहे.

शाळांसाठी महत्त्वाचा आदेश

या स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याने पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील.

12 नंतर शाळांना सुट्टी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा 58 ते 75 किलोमीटरच्या मार्गावर पार पडणार असून बालेवाडी ते बालगंधर्व दरम्यानच्या प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीत लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून नागरिक, पालक आणि वाहनचालकांना वाहतूक बदलांची पूर्वकल्पना घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Kolhapur Ration Card Update : रेशन कार्डधारकांना मोठा धक्का! 'या' जिल्ह्यातील २० हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद; तुमचे नाव तर नाही ना?
Special Trains : सलग सुट्ट्यांसाठी खुशखबर! कोल्हापूर, नांदेड आणि अमरावतीसाठी विशेष रेल्वे; वेळापत्रक व थांबे जाणून घ्या