Weather Update : उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, मुंबईत पावसाची स्थिती काय?

Published : Aug 09, 2026, 12:58 PM IST
Maharashtra Rain Update

सार

Maharashtra Weather Rain Update : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कमी झाला आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक भागातही फारसा पाऊस नाही. नुकतंच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रभरात कुठे, कसा पाऊस असेल?

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वादळासह, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसंच यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

१ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीतील महाराष्ट्रातील हंगामी पावसाची स्थिती पाहता, एकूण कामगिरी समाधानकारक असल्याचं चित्र आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची तूट आहे. या भागात अद्याप हवा तसा पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी फायदेशीर ठरतील, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे, तर नाशिकमध्येही आगामी काही दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पावसाची स्थिती काय?

मुंबईतील बोरीवली, चेंबूर, कुलाबा, मुलुंड, पवई, सांताक्रूझ आणि वरळी या भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मुंबईतील तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

देशभरातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत केरळ तसंच कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिण अंतर्गत भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. या आठवड्यात पश्चिम हिमालयीन क्षेत्र, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर