Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा पुढील मोर्चा दारू आणि चायनीजकडे, FDA कुठे करणार कारवाई?

Published : Aug 09, 2026, 10:58 AM IST
Tukaram Mundhe

सार

Tukaram Mundhe on Local Chinese Food : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांचं पुढील टार्गेट चायनीज फूड स्टॉल असल्याचं संकेत दिले आहेत. तसंच मद्याकडेही आपला मोर्चा वळवणार असल्याचं ते म्हणाले.

पुणे : एफडीए आयुक्त तुकामाम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कारभार हातात घेतल्यापासून त्यांनी अनेक लोकप्रिय, प्रसिद्ध हॉटेल्स, रेस्टॉरेंटवर धाडी टाकल्या. यात अनेक हॉटेल्समधील अन्नपदार्थ भेसळयुक्त, अतिशय खराब वस्तूंमध्ये किंवा अस्वच्छतेत बनवत असल्याचं आढळलं. आता तुकाराम मुंढे हॉटेल्सनंतर आपला मोर्चा मद्याकडे तसंच रस्त्यावरील चायनीज स्टॉलकडे वळवणार आहेत, पुण्यात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी दारूमुळे २० नागरिकांना मृत्यू झाल्याचं प्रकरण तुकाराम मुंढे यांनी बोलून दाखवलं. या गावठी दारूमध्ये चुकीच्या, घातक रसायनांचा वापर केला होता. हा विषय अतिशय गंभीर असल्याचं म्हणत आता पुढचा मोर्चा मद्याकडे, दारूकडे वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच या मुलाखतीमध्ये त्यांनी पुण्यात पहिल्यांदा चायनीज कुठे खाल्लं होतं, याचीही आठवण सांगितली. आता चायनीज स्टॉलवरील खाद्यपदार्थांकडेही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बापट रोड किंवा पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असतात. तिथेच मी माझं पहिलं चायनीज फूड खाल्लं असल्याची आठवण त्यांनी सांगितली. तेव्हा चायनीज काय असतं माहिती नव्हतं. भारत-चीन युद्धाचा मी अभ्यास केला होता, पण चायनीज फूडचा अभ्यास केला नव्हता. आता त्याच रोडवरील चायनीजच्या गाड्यांवर जाऊन बघावं का असा विचार केला आहे.

एफडीएने राज्यभरात कारवाया सुरू केल्या आहेत. आता नागरिकांकडून चायनीज फूडकडे लक्ष देण्याच्या सूचना होत आहेत. त्यामुळे चायनीज फूडकडेही लक्ष द्यायचं असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात मद्यावरील दुकानांमध्ये किंवा चायनीजच्या गाड्यावर एफडीएच्या धाडी पडल्या तर आश्चर्च वाटायला नको.

भेसळ, बनावट, निकृष्ट अन्नपदार्थाबाबत कुठे तक्रार कराल?

हॉटेलमधील अन्नपदार्थात किंवा कोणत्याही दुकानातील वस्तूमध्ये कुठेही भेसळ आढळल्या तुम्हाला याबाबत तक्रार करता येई शकते. बनावट निकृष्ट दर्जाच्या पदार्थांबाबत तक्रार करणं आता सोपं झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून एक वेबसाइट अपटेड करण्यात आली आहे. https://complaints.mahafda.in या साइटवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Earthquake : नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, शनिवारनंतर रविवारीही हादरे; शहरात भीतीचं वातावरण
Uddhav Thackeray: 'गद्दारांना' भेटणाऱ्या मोदींवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले - न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न?