Satyajeet Tambe : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आंदोलन, सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

Published : Aug 09, 2026, 12:24 PM IST
Satyajeet Tambe

सार

Nashik Pune Railway Line Police Detained MLA Satyajeet Tambe : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी आमदार सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

नाशिक : नाशिक - पुणे या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यात येणार आहे. मात्र नाशिक - पुणे रेल्वे मार्ग आधीप्रमाणेच करावा या मागणीसाठी आज ९ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं. आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त हे आंदोलन पुकारण्यात आलं. आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली सिन्नर येथील गोंदे फाटा, समृद्दी महामार्गाजवळ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, तसंच यावेळी पोलिसांनी सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतलं. आमदार सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं. यादरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

आंदोलन करताना सत्यजीत तांबे यांना रोखण्यात आलं. मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले होते. सत्यजत तांबे यांना रोखल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतलं. पुणे - नाशिक रेल्वे मार्ग खेड तालुक्यातूनच गेला पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या मागणीसाठीच रास्तारोको करण्यात आला.

नाशिक - पुणे या हायस्पीड रेल्वे १६ हजार कोटींचा प्रकल्प

नाशिक - पुणे या हायस्पीड रेल्वेचा प्रोजेक्ट तब्बल १६ हजार कोटींचा आहे. याच रेल्वेचा मार्ग बदलल्यामुळे खेड, जुन्नर, संगमनेर, आंबेगाव, चाकण, आळेफाटा या परिसरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. जुन्नरमधील नारायणगावातील जीएमआरटी या जागतिक दर्जाच्या दुर्बिणीला धोका निर्माण होत आहे, असं कारण देत नाशिक - पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा संगमनेर सिन्नर नाशिक असा मूळ मार्ग होता. हाच मार्ग रद्द करण्यात आला आहे. याऐवजीी नाशिक शिर्डी अहिल्यानगर चाकण अशा मार्गावरुन रेल्वे वळवण्यात येणार असल्याची योजना आहे.

हा मार्ग खेड, आंबेगाव, जुन्नर, सिन्नर आणि आजूबाजूच्या नागरिकांना मान्य नसून आधीचाच मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज ९ ऑगस्ट रोजी चाकण ते सिन्नरपर्यंत रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर