Maharashtra Rain Alert: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे.
मुंबई : ऑगस्टच्या अखेरीस राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यासारखा वाटत होता. मात्र, सप्टेंबरची सुरुवातच मोठ्या पावसाच्या इशाऱ्याने झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
26
कोकणात मुसळधार पावसाचा धोका
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यांत मध्यम पाऊस, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
36
घाटमाथ्यावर पावसाचा जोर
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
56
विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या भागांमध्ये देखील पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत मात्र हवामान खात्याने सध्या कोणताही इशारा दिलेला नाही.
66
नागरिकांनी घ्यावी खबरदारी
1 सप्टेंबर रोजी राज्यभरात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वारे आणि वीजेच्या कडकडाटामुळे धोका संभवतो, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात.