सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे विश्वजित कदम नाराज, विशाल पाटील अपक्ष उमेदवारी दाखल करणार

सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे येथील स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत.

vivek panmand | Published : Apr 9, 2024 10:36 AM IST

सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे येथील स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. येथील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समजली आहे. सांगली येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शुकशुकाट असून हे काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

विशाल पाटील यांचे कालच एक ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. या ट्विटमध्ये त्यांनी सांगली लोकसभेवर काँग्रेसचाच हक्क असून तो राहील असेही म्हटले होते. आता काँग्रेसने जागावाटपामध्ये सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे विशाल पाटील हे आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.  त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चाना उधाण आले आहे. 

स्थानिक काँग्रेस नेते पक्ष नेतृत्वावर नाराज - 
विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने स्थानिक नेते काँग्रेस पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथून विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून जीवाचे रान केले होते. पण आता पक्षाने तिकीट न दिल्यामुळे ते कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 
आणखी वाचा - 
महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद, सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटणार?
महाविकास आघाडीचा जागांचा तिढा सुटला, सांगली लोकसभा काँग्रेस लढवणार?

Share this article