
वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS पूजा खेडकरवर UPSC ने मोठी कारवाई केली आहे. आता तिची आयएएस पदवी रद्द करण्यात आली आहे. UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास किंवा निवड करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, त्यांची CSE-2022 साठीची उमेदवारीही आयोगाने रद्द केली आहे. यूपीएससीने सांगितले की, सर्व नोंदी तपासल्यानंतर असे समोर आले की, पूजा खेडकरने CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आयोगाने CSE च्या गेल्या 15 वर्षांच्या डेटाचे पुनरावलोकन केले ज्यामध्ये 15 हजारांहून अधिक उमेदवारांचा समावेश होता.
पूजा खेडकरवर फसवणुकीचा आरोप -
विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर बुधवारी (३१ जुलै) दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 1 ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे. नुकतेच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. यूपीएसपीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. पूजा खेडकर यांच्यावर नाव, छायाचित्र, ईमेल, पत्ता अशा कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.