Unseasonal Rain: अस्मानी संकट! अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीने झोडपले; गारांचा खच आणि पिकांचे नुकसान, 'या' जिल्ह्याला ४८ तासांचा ऑरेंज अलर्ट

Published : Mar 30, 2026, 06:19 PM IST

Unseasonal Rain: महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, धुळे, वाशिम जिल्ह्यांना अवकाळी पावसाने, गारपिटीने झोडपले. या नैसर्गिक संकटामुळे गहू, कांदा यांसारख्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

PREV
16
अस्मानी संकट! अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीने झोडपले

मुंबई: कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला आज निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. भर दुपारी राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे, नाशिक, धुळे आणि वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शहरांत गारवा आणला असला, तरी बळीराजा मात्र पूर्णपणे हवालदिल झाला आहे. 

26
१. पुण्यात गारांची पांढरी चादर

पुणे शहर आणि भोर तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केले. भोरमधील उत्रौली परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यावर गारांचा खच साचला होता. यामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

36
२. नाशिक आणि सिन्नरमध्ये कांदा मातीमोल

नाशिकच्या सिन्नर, नायगाव आणि जायगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव झाला. काही मिनिटांतच हिरवी शेते पांढरी पडली. यामुळे शेतात उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्याने खराब झाला असून, जोमदार वारा सुटल्याने गव्हाचे पीक जमिनीला टेकले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे तातडीने पंचनाम्यांची मागणी केली आहे. 

46
३. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही हजेरी

धुळे: साक्री आणि पिंपळनेर भागात रिमझिम पावसाने सुरुवात केली असली तरी कुसुंबा गावात गारा पडल्याने कांदा आणि मका उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

वाशिम: रिसोड तालुक्यात दुपारी अचानक ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतीचे गणित बिघडले आहे. 

56
सावधान! जळगाव जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

पुढील ४८ तास: जळगावला 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि जोरदार गारपिटीची शक्यता आहे.

वेळापत्रक: ३० आणि ३१ मार्च रोजी हवामान अत्यंत अस्थिर असेल. १ एप्रिलला 'यलो अलर्ट' असून २ एप्रिलपासून परिस्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. 

66
शेतकऱ्यांसाठी आवाहन

कापणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा. वीज चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories