प्रवास करताना टोलसाठी थांबावे लागणार नाही, ऑटोमॅटिक टॅक्स होणार कट

Published : Jul 26, 2024, 02:49 PM ISTUpdated : Jul 26, 2024, 05:13 PM IST
Nitin Gadkari

सार

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याची टोल व्यवस्था संपुष्टात आणून नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीद्वारे वाहनाच्या बाहेर पडण्याच्या वेळी किलोमीटरनुसार कर आपोआप कापला जाईल.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याची टोल व्यवस्था संपल्याची घोषणा केली. त्यांनी नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली. आता बाहेर पडण्याच्या वेळी किलोमीटरनुसार नवीन प्रणालीद्वारे कर आपोआप कापला जाईल. ते दोन महिन्यांत ही पद्धत सुरू होऊ शकते. रस्त्याच्या वापरावर आधारित थेट बँक खात्यातून पैसे कापले जातील, प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होईल.

परिवहन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केले मत 
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या घटनेबद्दलचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी टोल व्यवस्था पूर्णपणे संपवायची असून आता इथून पुढे ऑटोमॅटिक टॅक्स कट होणार असल्याचे सांगितले आहे. हे सर्व दोन महिन्यांमध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की, रस्त्याच्या वापरानुसार बँक खात्यातून पैसे कट केले जाणार आहेत. या नवीन योजनेमुळे सरकार टोल मुक्ती करणार असल्याचे दिसून येत आहे. 
आणखी वाचा - 
कारगिल विजय दिवस: पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे म्हटले
पंतप्रधान मोदी कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहून प्रकल्पाची करणार पायाभरणी

PREV

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा