पुणे आणि परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या गाडीतील प्रवाशांना चऱ्होली येथील योगेश भोसले यांनी धाडसाने बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले.
पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तेथील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे दिसून आले आहे. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर आलेला असताना ड्रायव्हरने धाडसाने वाहन त्या पाण्यामध्ये घातले, पण अशावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यामधील प्रवाशी गाडीसोबत वाहून जायला लागले. त्यावेळी चऱ्होली येथील योगेश भोसले यांनी धाडसाने या गाडीतील लोकांना बाहेर काढले आणि त्यांचा जीव वाचवण्याचे काम केले.
पाण्याच्या प्रवाहात गाडीमधील प्रवाशांना काढले बाहेर -
पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढत होता तरीही प्रवाशांनी त्या प्रवाहामध्ये गाडी घातली. त्यांना तो प्रवाह कमी आहे असे वाटून त्यामधून गाडी बाहेर जाईल असे वाटले पण प्रत्यक्षात त्यांना पाणी ओढायला लागले होते, यावेळी योगेश भोसले या तरुणाने त्या पाण्याच्या प्रवाहामधून गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यांनी जीवनदान दिल्यामुळे आम्ही वाचलो असेही या दोनही प्रवाशांनी आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
खासदार अमोल कोल्हे यांनी योगेश यांचे केले कौतुक -
खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी योगेश भोसले यांचे कौतुक केले आहे. त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे. अमोल कोल्हे योगेश यांचे कौतुक करताना म्हणतात की, "चऱ्होली गावचे सुपुत्र, धाडसी युवा सहकारी श्री. योगेश भोसले यांनी जीवावर उदार होऊन 2 जणांचे जीव वाचवले, त्याबद्दल त्यांचं कौतुक! नागरिक बंधू भगिनींनो, स्वतःची काळजी घ्या, प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, आपल्या जीवावर बेतेल अशी जोखीम पत्करू नका! खासदार कोल्हे यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा -
पंतप्रधान मोदी कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहून प्रकल्पाची करणार पायाभरणी
Kargil Vijay Diwas : कोरोलिनची लढाई खूप कठीण होती : ब्रिगेडियर कुशल ठाकूर