मुंबई गुजरातची राजधानी, केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांच्या वक्तव्याने खळबळ

Published : Jul 06, 2025, 04:00 PM IST
pratap jadhav

सार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' वक्तव्यानंतर आता प्रताप जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनता चवताळली आहे.

सध्याच्या काळात वादग्रस्त विधान करण्याची स्पर्धा लागलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर आता प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं म्हटल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जनता चवताळली आहेत.

प्रतापराव जाधव काय म्हणाले? 

संयुक्त महाराष्ट्र त्यावेळी होता, मुंबई गुजरातची राजधानी होती. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात, गुजरात काही पाकिस्तानचा प्रांत नाही. आपल्या शेजारचे राज्य आहे त्यामुळे अशा गोष्टीचे राजकारण करायला नको. ज्या कार्यक्रमात आम्हाला बोलावलं जात, त्यावेळी आम्ही आमचा स्वाभिमान जपून त्यांचाही स्वाभिमान जागृत करतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचे नाही. यावेळी उद्धव ठाकरेंना प्रश्न कोणी का विचारत नाही. शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांना म्हणायचे, उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडलं याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या वाणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे.

ठाकरे बंधूंनी पश्चाताप मेळावा घ्यावा - 

ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेण्यापेक्षा पश्चाताप मेळावा घ्यायला हवा असं ठाकरे बंधूंनी म्हटलं आहे. यामुळे विरोधी पक्षीयांनी जाधव यांच्यावर टीकेला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत गुजराती समाजाला मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली होती. त्यावरुन टीका झाली होती.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!