तुकाराम मुंढेंनी कॅन्सरचं खरं कारण सांगितलं, ऐकून तुम्ही व्हाल थक्क

vivek panmand   | CMS
Published : Aug 02, 2026, 06:13 PM IST
Tukaram Mundhe

सार

तुकाराम मुंढे यांनी एका विधानाने सर्वांना धक्का दिला असून, त्यांच्या मते सिगारेट किंवा दारू न पिणाऱ्या व्यक्तींनाही कॅन्सर होतो. यामागे भेसळयुक्त अन्न आणि चुकीची जीवनशैली हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. समाजात बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला तुकाराम मुंढे हे वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आले आहेत. आता त्यांनी कॅन्सरबाबत एक विधान करून सर्वांना धक्का दिला आहे. मुंढे यांनी म्हटलं आहे की, अनेकदा एखादा व्यक्ती सिगारेट किंवा दारू घेत नाही. तरीही तो मला कॅन्सर कसा झाला हे विचारतो. अशावेळी त्याच्या राहणीमानात आणि खाण्यात हे कारण लपल्याच आपल्याला समजत.

मला या पदावर आल्यावर माहित झालं 

मला या पदावर आल्यावर माहित झालं की आपण जे जेवतो त्या प्रत्येक पदार्थात भेसळ होत असते. आपण भेसळयुक्त पदार्थ झाल्यामुळं आपण आजारी पडत असतो. आपण शाळेमध्ये हे नियम कसे पाळण्यात येतील याबद्दल काळजी घेत आहोत. शाळेमध्ये होणारा बदल हा माझ्या एकट्याने होणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्वाना मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे.

आपल्याला तस जगावं लागेल 

आपली मुलं हि घरी असताना टीव्ही पाहत कोल्ड्रिंक पितात. त्यावेळी आपण त्यांना पिऊ नको असं म्हणू शकतो. पण त्याच पालन करायचं की नाही हा निर्णय त्याला घ्यायचा असतो. अशावेळी त्यानं आपल्या आयुष्यात या नियमांचे पालन करायला हवं. आपण सगळं हे आचरणात जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत समाज हा पुढं जाऊ शकत नाही.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक