Maharashtra Weather : मुंबई-कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, राज्यासह देशभरात पावसाचा जोर वाढला

Published : Aug 02, 2026, 08:13 AM IST
Maharashtra Rain

सार

Maharashtra Rain Update : हवामान खात्याकडून राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, कोकण, मध्यमहाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी उसंत घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार सुरुवात केली आहे. आज कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

आज कसं असेल हवामान?

आज २ ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती या भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापैकी बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमान २८ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांतही पावसाचा हा असा जोर कायम राहण्याची शक्यता, IMD कडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यासह देशभरातही मुसळधार पाऊस

आसाममध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत ६६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. घरं, शेती, दुकानं, मंदिरं सगळंच पुराच्या पाण्याखाली गेलं असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

आज २ ऑगस्ट रोजी उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहील. दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांतही पावसाचा जोर राहील. तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पुढील तीन ते चार दिवसांत बहुतांश राज्यांच्या तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. अशाच स्वरुपाच्या पावसाची शक्यता देशभरात वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशाच्या अनेक भागांत मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. देशभरातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र पाऊस आणि त्यामुळे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक