
तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक कार्यशैलीचा खासकरून ओळखले जातात. त्यांनी नवीन पदग्रहण केल्यापासून धुमधडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्यांनी आता दूध विक्रेत्यांसाठी ८ प्रकारचे नियम लागू केले असून त्याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
१. समानपणे केले आदेश लागू - दूध संकलन केंद्र, बल्क मिल्क कुलर, चिलिंग सेंटर डेअरी, प्रक्रिया उद्योग वाहतूकदार, वितरक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना सर्वांना आदेश समानपणे लागू असेल.
२. कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी केला हा नियम - दुधाची विक्री करताना अटींचे पालन करावे लागेल. प्रत्येक ठिकाणी हे दूध पिण्यापुर्वी उकळणे गरजेचे असल्याचं लिहावं लागेल.
३. सुरक्षित पॅकेजींग - पास्चराइज दुधासाठी सुरक्षित पॅकेजिंग करायला सांगितलं आहे. पाश्चराइज्ड, प्रमाणित किंवा इतर उष्णताप्रक्रिया केलेले दूध सीलबंद आणि लेबलयुक्त पॅकेजिंग करून विकता येईल.
४. Food Grade उपकरणे - फूड ग्रेडिंग करताना फक्त स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा लागेल.
५. संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक - दुधाचं उत्पादन कधी झालं इथपासून ते कधी विक्री झाले इथपर्यंत त्याची माहिती संकलित करून ठेवावी लागणार आहे.
६. कोल्ड स्टोरेजला लवकर आणणे - दूध दोन तासाच्या आत कोल्ड स्टोरेजला आणून त्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे.
७. वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र आवश्यक - दुधाला हाताळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
८. अन्न व्यवसायाची जबाबदारी - प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करायला हवं असं सांगण्यात आलं आहे.