नरहरी झिरवळ यांचा घातक एनर्जी ड्रिंकबाबत निर्णय, थेट इशारा

Published : Jul 03, 2026, 06:14 PM IST
narhari zirwal

सार

आपल्या धडक कामगिरीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी आता हॉटेल आणि स्वीट दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी पेस्ट कंट्रोल, स्टेनलेस स्टीलची भांडी आणि कोल्ड चेन मेंटेन करण्याबाबत कडक सूचना दिल्या आहेत. 

तुकाराम मुंडे त्यांच्या धडक कामगिरीसाठी खासकरून ओळखले जातात. आता त्यांनी हॉटेल आणि स्वीट दुकानांवर धडक कामगिरी करायला सुरुवात केलीय. पेस्ट कंट्रोल व्यवस्थित करायला हवं, हॉटेलमध्ये स्टेनलेस स्टीलची भांडी वापरायला हवी असं तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कोणत्याही खाण्याच्या गोष्टीत फसवणूक करू नका असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले तुकाराम मुंडे? 

तुकाराम मुंडे हे आक्रमक पद्धतीने पत्रकार परिषदेत बोलताना दिसून आले. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, सर्व गोष्टी या स्टॅंडर्डपणे करायच्या आहेत. कोल्ड चेन मेंटेन करणे खूप आवश्यक आहे. कच्चे दूध हे दोन तासाच्या आतमध्ये कोल्ड प्रोसेसिंग करण्यासाठी आणायला हवं. हि प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला हवी असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलंय.

शाळेपासून ५०० मीटर अंतरावर एनर्जी ड्रिंक विकता येणार नाही 

शाळेपासून ५०० मीटर अंतरावर एनर्जी ड्रिंक विकता येणार नाही असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलं आहे. यावेळी विधानभवनात तुकाराम मुंडे यांची एंट्री झाली होती. श्रीगोंदा विधानसभेचे आमदार विक्रांत पाचपुते यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. आता यावर कशी कारवाई होते ते लवकरच दिसून येईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

पावसाचा जोर किती दिवस राहणार, यावर हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त
शाळेच्या परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई