पावसाचा जोर किती दिवस राहणार, यावर हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त

Published : Jul 03, 2026, 04:41 PM IST
Monsoon Health

सार

महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झाला असून कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे, ठाणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

महाराष्ट्र - राज्यात पाऊस जोरदार पडत असल्याचं दिसून आलं आहे. घाट माथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस पडत आहे. बाकी ठिकाणी मात्र पाऊस कमी प्रमाणावर होत आहे. बाकी सगळीकडं हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. पुढील येणाऱ्या ३ ते ४ दिवसांमध्ये मुंबईत चांगला पाऊस पडण्याची हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे.

मान्सूनचे वारे झाले सक्रिय 

मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टी, आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाणे, रायगड आणि सातारा भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. ६ जुलैनंतर पाऊस कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त झाला पाऊस 

राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळं पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात एका बाजूला चांगला पाऊस झालेला दिसत नाही. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

FDA Crackdown: मुंबई-पुण्यात FDA चा धडाका! हॉटेल, डार्क स्टोअर्सवर कारवाईचा बडगा
Palghar News : पालघरमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून दादागिरी, शिंदेंचा मोठा दणका; ७ शिवसेना पदाधिकाऱ्यांचं निलंबन