
अकोला: मागील काही दिवसांपासून तुकाराम मुंडे हे चर्चेत आले आहेत. त्यांनी हॉटेल, दूध संस्था आणि विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. त्यांच्या कारवाईनंतर नागरिक निश्चित झाले आहेत. अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असतो. आता तुकाराम मुंडे यांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
तुकाराम मुंडे यांच्या पथकाने अकोला येथे धाड टाकली आहे. त्यांनी प्रतिबंधित गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी हि एकत्र मिळून कारवाई केल्याचं सांगण्यात आलं. या कारवाईमध्ये तब्बल ५० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गुटखा, पान मसाला कच्चा माल जप्त करण्यात आलं आहे.
या प्रकरणानंतर विभागानं अतिशय कडक पाउल उचलायला सुरुवात केली आहे. कंपनीचा संचालक गौरव शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याच्याविरुद्ध मकोका कायद्याअन्वये कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंडे यांनी मागील काही दिवसांपासून कडक कारवाईला सुरुवात केली आहे.