Siya Goyal : माझ्या कुटुंबाविरोधात कट, आम्ही त्रासात; माझी मुलगी दोषी असेल तर तिला फाशी द्या, पण...

Published : Jul 16, 2026, 07:39 PM IST
Siya Goyal Shop FDA Raid

सार

FDA Raid on Siya Goyal Father Shop : अन्न व औषध प्रशासनाने सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर धाड टाकली. त्यांचं दुकान सध्या बंद ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांनी हा कट असल्याचं म्हटलं आहे.

पुणे : मागील महिन्यात पुण्यातील लोहगडावरुन ढकलून सिया गोयल या २० वर्षीय तरुणीने तिचा होणारा पती २६ वर्षीय केतन अग्रवाल याची हत्या केली होती. या प्रकरणात सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला लोहगडावरुन ढकलून संपवलं. सध्या सिया आणि चेतन हे दोघेही जेलमध्ये आहेत. याप्रकरणात त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, सियाच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्डमध्ये ड्रायफ्रूटचं दुकान आहे. त्यांच्या या दुकानावर मंगळवारी १४ जुलै रोजी एफडीएची धाड पडली. यानंतर सियाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सियाचे वडील प्रविण गोयल?

FDA ची दुकानावर धाड पडल्यानंतर प्रविण गोयल यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले 'तिला फाशी देण्याऐवजी मला फाशी देत आहेत, माझ्या कुटुंबाला फाशी देत आहेत. जर सिया दोषी असेल, तर तिला फाशी द्या. मी पूर्णपणे कायद्यासोबत आहे. न्यायालयाला माझी जी काही मदत लागेल, त्यासाठी मी मदत करायला तयार आहे. जर माझी मुलगी दोषी असेल तर तिला नक्की शिक्षा मिळावी. पण माझ्या कुटुंबाविरोधात जो कट केला जात आहे, त्यामुळे मला, माझ्या पत्नीला ही फाशी दिली जात आहे असंच वाटतं आहे. मी मागील अनेक दिवसांपासून अतिशय त्रासात आहे.'

'हा कोणीतरी केलेला कट असू शकतो. माझ्याकडून सँपल गोळा करण्यात आले आहेत. ते सँपल पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तोपर्यंत माझं दुकान बंद ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. मला सांगितलेल्या गोष्टींचं मी पालन करतो आहे. माझं दुकान सिल करण्यात आलेलं नाही. केवळ बंद करण्याचं सांगण्यात आहे.'

'१४ जुलै रोजी सकाळच्या ११.३०च्या सुमारास माझ्या दुकानात अधिकारी आले होते. त्यांनी दुकानातून चार प्रकारचे सँपल घेतले. दोन प्रकारच्या हळद पावडर, सोयाबिन वडी, तीळ याचे सँपल घेतले आहेत. माझं आधी भाडेतत्त्वावर दुकान होतं. त्यावेळी आम्ही २०२५ ते २०३० पर्यंत दुकानाचं लायसन्स अप्लाय केलं आहे. पण पाच ते सहा महिन्यापूर्वी स्वत:च्या दुकानातील गाळा नंबर टाकायचं राहून गेलं आहे. ते आता पुन्हा बनवण्यासाठी देण्यात आलं आहे. ते लायसन्स आठ ते दहा दिवसांत येईल', अशी माहिती सिया गोयसचे वडील प्रविण गोयल यांनी दिली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात या तारखेला होणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का?
नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट, 5 लाखांमध्ये नीटच्या केमिस्ट्रीचा पेपर फोडल्याचा दावा