
नाशिकमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तीन मुले एका मित्राच्या शेतावर खेळायला गेले होते. तिन्ही मुलांचा बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्यात बुडून मृत्यू झाला. या तिघांच्या कुटुंबियांना मृत्यूची घटना कळल्यावर त्यांच्या घरी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश झाला. योगायोगाने त्या तिघांचं नाव साई होत.
साई हिलाल जाधव, साई केदारनाथ उगले आणि साई गोरख गरड असं मृत्युमुखी पडलेल्या तीन मित्रांची नाव आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी गरड यांच्या येथे गोठ्यावर सर्व मित्र मिळून खेळायला गेले होते. चौघे मित्र वासरासोबत खेळले नंतर आपण पोहायला जाऊ असं सर्वांचे ठरले होते पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी ठरलं होत.
सर्व मित्रांना घरी जाताना पोहण्याचा मोह झाला होता, बांधकाम साईटवर मित्रांनी बांधकामाच्या ठिकाणी पोहण्याच ठरवलं. पण या ठिकाणी एका मित्राने माघार घेतली. घरी आई वाट पाहत असेल म्हणून तो मित्र निघून गेला. त्यानंतर साई नावाचे तिघे मित्र पाण्यात उतरले आणि त्यांचा त्या खड्यात पडूनच मृत्यू झाला. तिघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. रविवार दुपारपासून तिघेही बेपत्ता झाल्यामुळे त्यांचे कुटुंबियांना चिंता वाटत होती. तिघांचे मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला होता.