
पुण्याचे तापमान काही दिवसांपासून २९ ते ३० अंश दरम्यान नोंदवण्यात आले आहे. पुढील ३ दिवस अशाच प्रकारचे हवामान राहील अशी शक्यता वर्तवली. या ३ दिवसांमध्ये हलक्या पाऊस होईल असं सांगण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते. दुपारी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या पावसाने हजेरी लावली होती.
दुपारी पाऊस पडून गेल्यामुळं वातावरणात आल्हाददायक वातावरण निर्माण झालं होत. उकाडा वाढत गेल्यामुळं पुणेकरांना या पावसामुळं पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान ३० डिग्री आणि किमान २२.४ डिग्री किमान तापमान नोंदवण्यात आले. गायनॅटिक पश्चिम बंगाल व आसपासच्या किनारी भागावर असलेला कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, लातूर आणि साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आली आहे. कमाल तापमानात वाढ झाली आहे, आकाश अंशतः ढगाळ आणि हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.