हा अपघात नसून हत्या आहे, पुणे हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांची संतप्त भावना

शनिवारी मध्यरात्री वेगवान गाडी चालवून दोघांना उडवले, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केली आहे. 

vivek panmand | Published : May 21, 2024 7:35 AM IST / Updated: May 21 2024, 01:06 PM IST

शनिवारी मध्यरात्री पुणे येथील कल्याणीनगर भागात एका भरधाव जाणाऱ्या मोटारीने दोघांना उडवले, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. एका सतरा वर्षीय मुलाने महागड्या गाडीला वेगाने चालवून हे कृत्य केले आहे. यामुळे या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. मुलाला घटना घडून गेल्यानंतर पाच अटी घालून देऊन जामीन देण्यात आला पण आता त्याचे वडील विकास अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. 

मृतांच्या नातेवाईकांच्या संतप्त भावना -
यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. मृत अनिश स्वाधियाचे आजोबा बोलताना म्हणतात की, "पुण्यातील प्रख्यात व्यावसायिकाचा मुलाला जामीन मिळायला नको होता. "या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे झालेले पूर्णपणे चुकीचे आहे. आरोपींना कठोर शिक्षा हवी आहे. आरोपींना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा," असे ते म्हणाले.

त्याचे काका अखिलेश अवधिया म्हणतात, "अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि ताशी 240 किमी वेगाने गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. ही हत्या आहे, अपघात नाही." आश्विनी कोष्ठा यांच्या नातेवाईकांनी दुःख व्यक्त केले आहे. अनिश अवधिया सोबत यावेळी अश्विनी याही होत्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे काका किशोर यांनी सांगितले आहे की, “आम्हाला धक्का बसला आहे. त्याला 15 तासांत जामीन मिळाला हे निंदनीय आहे. त्याची आणि त्याच्या आई-वडिलांची चौकशी झाली पाहिजे. अश्विनीचे अंतिम संस्कार झाल्यानंतर आम्ही या प्रकरणावर चर्चा करू.”
आणखी वाचा - 
बारावीचा निकाल 93.37 टक्के, यंदाही मुलींची बाजी तर कोकण विभाग सर्वात अव्वल!
एमिरेट्सच्या विमानाने लँडिंग होताना फ्लेमिंगो पक्षांना दिली धडक, 40 पक्षांचा झाला मृत्यू

Share this article