
राज्यात प्रथमच एसटीडीच्या विशेष बस सेवेमुळे भक्तांना विठुरायाचे स्वस्तात दर्शन करता येणार आहे. एखाद्या गावातून 40 किंवा जास्त लोकांचा भाविकांचा ग्रुप असल्यास त्यांना थेट गावातून पंढरपूरला जाण्याची सुविधा मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे ‘गाव-टू–पंढरपूर’ कनेक्शन मोठी क्रांती असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या काळात ५ हजार २०० बसेस सोडण्यात येणार असून गावातून पंढरपूरला बस सेवा असल्यामुळं हा निर्णय भाविकांसाठी चांगला निर्णय ठरला आहे.
एकूण 5,200 विशेष बसेस या वर्षी, एसटी महामंडळाने एकूण 5,200 विशेष बसेस तर ठाण्याच्या परिवहन विभागातून देखील जास्तीत जास्त भाविकांच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. . यामध्ये पुणे विभागातून 700 बसेस, तर इतर जिल्ह्यांपासून अतिरिक्त बसेस पाठवल्या जात आहेत .
प्रत्येक गटासाठी नावनोंदणी करून गावातून थेट वारीचा प्रवास करता येणार आहे. यामध्ये डिजिटल यादी, पूर्वनोंदणी, आरक्षित बस सेवा आणि आरोग्य सुविधा यांचं संपूर्ण मॅनेजमेंट असणार आहे. काही मार्गांवर GPS ट्रॅकिंग, मोबाइल मेसेजद्वारे बस वेळा, वारी मार्गावर QR कोड तिकीट सुविधा यासारखी स्मार्ट तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही यात्रा आता 'योजनेतून यशाकडे' वाटचाल करत आहे. या योजनेमध्ये बस सुविधा मिळाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वारी म्हणजे फक्त भक्तीची वाटचाल नव्हे, ती एक सामाजिक चळवळ आहे. आता यामध्ये वयोवृद्धांसाठी स्वच्छतागृहांची वेगळी सुविधा, स्त्रियांसाठी 'हिरकणी केअर झोन', आणि हरवलेल्या भाविकांसाठी 'स्मार्ट शोध केंद्रे' उभारण्यात येणार आहेत. हे केंद्र फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने जोडले जाणार आहेत. ही वारी म्हणजे प्रशासनाच्या 'मानवकेंद्रित' दृष्टिकोनाचा एक सुंदर नमुना आहे. ज्याप्रमाणे वारकरी विठोबाच्या भेटीसाठी भावनेने येतो, त्याचप्रमाणे आता शासनही भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहे – हीच खरी यंदाची वारीची बसवारी ठरणार आहे.