१ लिटर दुधाची किंमत पोहचणार १०० रुपयाला, गुजरातला म्हशी खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा

Published : Jul 12, 2026, 10:53 PM IST
milk

सार

तुकाराम मुंडे यांच्या भेसळयुक्त दुधावरील कारवाईमुळे दूध संकलनात मोठी घट झाली आहे. यामुळे बाजारात दूध, तूप, पनीरची टंचाई निर्माण झाली असून, लवकरच दुधाचे भाव १०० रुपये प्रति लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्याच्या काळात तुकाराम मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर धाडी टाकायला सुरुवात केली आहे. भेसळयुक्त दुध जप्ती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आता म्हैस आणि गाई खरेदी करायला सुरुवात केली आहे. मराठवाड्यात जवळपास १ लाख लिटर दुधाचं संकलन होत, ते आता कमी झालेलं आहे.

महाराष्ट्रात दुधाचं उत्पादन झालं कमी 

महाराष्ट्रात आता दुधाचं उत्पादन कमी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये २०२५ अखेर ४२ लाख ८७ हजार लिटर दुधाचं संकलन कमी झालेलं आहे. जालना जिल्ह्यातील एका कारखान्यात एक लाख लिटरने घट झाली आहे. दुधवाल्याची आता इज्जत वाढल्याच दूध डेअरी मालकाने म्हटलं आहे. आता काही दिवसांनी दुधाचे भाव वाढून १०० रुपये लिटर पर्यंत होऊ शकतात.

शेतकरी म्हशींची करणार खरेदी 

दूध डेअरी मालकाने म्हटलं की, आता भाव वाढायची आता शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटमधून दूध, तूप, पनीर आता मार्केटमधून गायब झालं आहे. त्यामुळं दुधाची किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तुकाराम मुंडे आल्यापासून एक सकारात्मक बदल आपल्याला दिसून येत आहे. ग्राहकांना आता क्वालिटी म्हणजे काय हे नेमकं माहित झालेलं आहे. आता शेतकऱ्यांनी म्हशी घेण्याची संख्या वाढलीयं.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'