मोशी इमारत दुर्घटनेची शोध मोहीम थांबली, ९ जणांचा झाला मृत्यू

Published : Jul 12, 2026, 04:13 PM IST
Moshi Building Collapse

सार

पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, ८३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य थांबवण्यात आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून दोषींवर कारवाई होणार आहे.

पिंपरी चिंचवड: पावसामुळं सध्याच्या काळात दुर्घटना घडण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आता मृतांचा आकडा हा ९ पर्यंत जाऊन पोहचला आहे. कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्यामुळं हि दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली. या दुर्घटनेत ९ जणांना वाचवण्यात पथकाला यश आलं.

बचावकार्य तातडीने राबवलं 

हि दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य तातडीने राबवण्यात आलं. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने हे बचाव कार्य राबवण्यात आलं होतं. या बचावकार्याच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी ८३ तास शोधमोहीम राबवण्यात आली.

शोधमोहीम थांबवण्यात आली 

या सर्व ठिकाणांची तपासणी झाल्यानंतर शोधमोहीम पूर्णपणे थांबवण्यात आली. या भीषण दुर्घटनेमुळं संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपासाला वेग आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथे बैठक घेतली. आता लवकरच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'