पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्या, आता पाऊस कधी पडणार?

Published : Jul 14, 2026, 09:39 PM IST
Common Monsoon Skin Infections Symptoms

सार

महाराष्ट्रात जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाने ओढ दिली आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अल नीनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून, राज्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस पडतो का नाही असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. जुलै महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण पाऊस न पडता ऊन मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात आता पाऊस पडतो का नाही अशी शंका निर्माण झाली आहे..

अल नीनोमुळं पाऊस होईल का? 

प्रशांत महासागरातील अल नीनो आणखी शक्तीशाली झाला आहे. अफगाणिस्तानातील गरम वारे पुन्हा भारताच्या दिशेने येत असून त्यामुळं मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. आता 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता काहीदिवस तरी पाऊस पडणार नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

पावसामुळे शेतकरी चिंतेत 

जुलै महिना अर्धा संपला पण महाराष्ट्रात कुठेही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसात मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. धरणं आणि नद्या आता पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळं अनेक भाग अजूनही कोरडा पडलेला आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार हळूहळू तापमान वाढत चाललं आहे.

दुबार पेरणीचे संकट 

पावसात खंड पडल्याने राज्यात दुबार पेरणीची वेळ निर्माण झाली आहे. अतिशय अडचणीच्या परिस्थिती मदतीसाठी डीपीडीसीमधून निधी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. काही भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका