
राज्याच्या काही भागात सध्या पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही पाऊस न पडल्यामुळं शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्यात मात्र आजही पावसाचा अंदाज असून कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, पालघर, काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली काही भागात मुसळधार पावसासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
सिंधुदुर्ग, पुणे नाशिक, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सोबत मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला. तिथं पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ईशान्य उपसागरापर्यंत तो सक्रिय झाला आहे. आता पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण तयार झालं आहे.