Ajit Pawar 67th Jayanti : "आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय…" सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काढली आठवण

Published : Jul 22, 2026, 09:47 AM IST
Ajit Pawar Jayanti

सार

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. यानिमित्त सोशल मीडियावर अजित पवारांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (२२ जुलै) ६७ वी जयंती आहे. यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दादांच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अजित पवार यांची समाजाप्रति सेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीचे त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. सामाजातील सर्व वर्गात त्यांना सन्मान दिला जात होता. राज्यात एनडीए सरकार त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.”

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कारकिर्दीची एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय पोस्टला कॅप्शन देत म्हटले की, “दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!”



 

 

 

सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट 


दिवगंत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय मध्यरात्री १२ वाजता सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान परिसरातील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. येथे पुष्पहार अर्पण करण्यासह अभिवादन केले. 



सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला... घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...”

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हवामान विभागाचा मोठा इशारा; पुढील 24 तासांत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज
कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी, काही ठिकाणी विजांसह पाऊस कोसळणार