
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला आहे. ३० जिल्हे आणि विशेषतः मराठवाडा परिसरातील पूर्वपरिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढं ढकलण्यात यावी अशी अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. आता अखेर विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. २८ सप्टेंबर रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा आता ९ नोंव्हेंबरला होणार आहे.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना एमपीएससीने एकप्रकारे दिलासा दिला आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा त्याच वेळेत होणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती. पण आता परीक्षा पुढं ढकलल्यामुळे काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने एक प्रकारे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतलं आहे. पूर्वपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यांना परीक्षा द्यायला जाताना अडचणी निर्माण झाल्या असत्या. परीक्षा पुढं ढकल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. राज्यातील अनेक आमदार आणि खासदार यांनी मागणी केली होती.
लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी केली होती. त्यांनी परीक्षा पुढं ढकलण्यात यावी, विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये लोकप्रतिनिधींनी भेट दिली आणि अनेक ठिकाणी पंचनामा करून सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली होती.