काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत ताकदीने सामोरे जाण्याची घोषणा केली आहे. जनतेला महाराष्ट्रात परिवर्तन हवे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे आणि महाभ्रष्ट सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीला काँग्रेस सोबत महाविकास आघाडी ताकदीने सामोरे जाणार असून याबाबतची घोषणा काँग्रेसच्या वतीने दिली आहे. जनतेला महाराष्ट्रात परिवर्तन हवे असून महाविकास आघाडी जागावाटपाच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही मिळून या निवडणुकीत महाभ्रष्ट सरकार हे उखडून टाकू असे के. सी. वेणुगोपाल यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बैठकीला कोण होते उपस्थित -
सदर बैठकीला यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ आणि महाराष्ट्रातील नेते उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला हे दोघेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये खासकरून विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटील उपस्थित होते.
वेणुगोपाल यांनी काय सांगितले? -
या बैठकीनंतर वेणुगोपाल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी बोलताना म्हटले आहे की, राज्यातील महाभ्रष्ट सरकारला सत्तेतून बाहेर काढायचे असून भाजपा सरकारने लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येमध्ये पराभव झाल्यानंतर बद्रीनाथ येथे त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर जाणते विश्वास ठेवायला तयार नाही. विधानपरिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रोस वोटिंग केली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे, काही दिवसांमध्ये आपल्याला त्याची माहिती मिळेल. यामुळे काँग्रेस पक्ष आता कोणत्या आमदारांवर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आणखी वाचा -
व्यापारी हल्ला प्रकरण: आरोपी सद्दाम सरदारला बंगालच्या कुलटाली येथून अटक
अनुष्का आणि विराटने पहिल्यांदा दाखवली मुलाची झलक, लंडनच्या रस्त्यावर