
आपल्या जीवाचं कधी काय होईल सांगता येत नाही. लातूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तो छत्रपती संभाजीनगर येथे एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. कोकणात फिरायला गेला असताना त्याचा ताम्हाणी घाटात मृत्यू झाला आहे. महेश रमेश गुट्टे याचा रविवारी अपघात झाला आणि त्यातच त्याचा जीव गेला.
किनगाव येथील व्यापारी रमेश शंकरराव गुट्टे यांचा मुलगा महेश हा मित्रांसोबत कोकणात फिरायला गेला होता. तो मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेची तयारी करत होता. फिरायला जाताना मित्रांनी चार चाकी गाडी आणि बाईक घेऊन गेले होते. घाटातील छायाचित्र काढण्यासाठी महेश हा बाईकवर चालला होता आणि त्यातच त्याचा अपघात झाला.
अपघात ताम्हणी घाटामध्ये झालेल्या अपघातात महेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात गंभीर जखमी झालेल्या महेशचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या पार्थिवावर घरी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या मागे आई वडील, दोन बहिणी, चुलते असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गाडी चालवताना काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलं आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला. दोन मित्र बाईकवरून सोलापूरकडे जात असताना, रस्त्यावर ओल्या मातीमुळे त्यांची बाईक अचानक घसरली. मागे बसलेला २३ वर्षीय तरुण डोक्यावर पडल्यामुळे जागीच मृत झाला, तर चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी तात्काळ पोलिस व रुग्णवाहिका बोलावली, पण उपचारापूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता.
अपघातग्रस्त दोघांनीही हेल्मेट न घातल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. रस्त्याची अवस्था खराब असतानाही वेगात गाडी चालवणं आणि सुरक्षेची साधनं न वापरणं हेच या अपघातामागील प्रमुख कारण ठरलं. पावसामुळे रस्त्यांवर घसरट माती व खड्डे तयार झाले असून, अशा परिस्थितीत बाईक चालवताना अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे.
या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्यावर भर दिला आहे. युवकांनी फक्त गाडी चालवण्याची हौस न ठेवता सुरक्षेचं भान ठेवणं आवश्यक आहे. अपघातानंतर मृताच्या घरच्यांवर जे संकट येतं, त्याची कल्पनाही नसते. त्यामुळे रस्त्यावर चालवताना नियमांचं पालन करणं आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेणं ही काळाची गरज आहे.