बीड हत्याकांड प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींचे बंदुकीचे परवाने रद्द करण्याचे आणि संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
संतोष देशमुख या बीड हत्याकांडाचे रोज नव नवे आरोप होताना दिसून येत आहे. केज तालुक्यातील सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी काल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्वच पक्षातील नेते उपस्थित असल्याचं दिसून आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाल्मिक कराडला अटक करून धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या अशी आग्रही मागणी केली होती. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत.
फरार आरोपींचे बंदुकीचे परवाने रद्द करण्यात यावेत असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले असून याप्रकरणात तातडीने पाऊले उचलण्यात यावेत असं म्हटलं आहे. कडक कारवाईला आता सुरुवात होईल, अशी शक्यता आता सामान्य लोकांना वाटायला सुरुवात झाली आहे.
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा. ही प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच आतापर्यंत ज्या बंदुकीचे परवाने दिले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या.