स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपीने वर्षभरात २२ हजार वेळा पाहिले अश्लील व्हिडीओ

Published : May 03, 2025, 05:01 PM IST
datta gade

सार

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने गेल्या एका वर्षात २२ हजार वेळा अश्लील चित्रपट पाहिल्याचे उघड झाले आहे. 

पुणे, प्रतिनिधी — शहरात गाजत असलेल्या स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणात एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने गेल्या एका वर्षात तब्बल २२ हजार वेळा अश्लील चित्रपट पाहिले असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीचा पंचनामा करत ही माहिती न्यायालयात सादर केली आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मदतीने उघड झाली विकृती दत्तात्रय गाडेचा मोबाईल हाती लागला नसतानाही, त्याचा नवीन नंबर मिळवून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याच्या जीमेल अकाउंटची सर्च हिस्ट्री तपासण्यात आली. तपासात असं निष्पन्न झालं की, आरोपी रोज सरासरी ६० वेळा पॉर्न पाहत होता. याशिवाय, त्याने याआधीही अश्लील कृत्य केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

अत्याचाराच्या रात्री काय घडलं? 

२५ फेब्रुवारीच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने पीडितेला खोट्या माहितीच्या आधारे बसमध्ये बोलावलं. बसमधील दोन्ही दरवाजे बंद करत, तिला जीवे मारण्याची धमकी देत त्याने दोन वेळा अत्याचार केला.

तांत्रिक विश्लेषणात आरोपीचं धक्कादायक वर्तन 

उघड त्याच्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषणात दिसून आलं की तो वारंवार स्वारगेट एसटी आगारात येत होता. ही गोष्ट त्याच्या संभाव्य ‘सत्रशील’ वर्तनाचा इशारा देते.

पोलिसांचा जामीनाला जोरदार 

विरोध पोलीस विभागाने न्यायालयात स्पष्ट नमूद केलं की, जामीन मिळाल्यास आरोपी पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू शकतो. तसेच तो पीडितेला आणि साक्षीदारांना धमकावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

८९३ पानांचं आरोपपत्र दाखल 

स्वारगेट पोलीस ठाण्याने या प्रकरणात ८९३ पानांचं आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल केलं आहे. यात सायबर पुरावे, पीडितेचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपशीलांचा समावेश आहे.

PREV

Recommended Stories

नाताळ–नववर्षाचा धमाका! मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!