15 वर्षांपासून अंडरग्राउंड असणारा माओवादी प्रशांतला अखेर अटक

Published : May 05, 2025, 12:47 PM IST
arrest

सार

Maharashtra : संगणक आणि लॅपटॉप रिपेअरिंग करणारा आणि पुणे येथे राहणारा ताडीवाला रोड वस्तीमध्ये राहणारा प्रशांत कांबळे याला अखेर अटक करण्यात आली आहे.

Maharashtra : संगणक आणि लॅपटॉप रिपेअरिंग करणारा आणि पुणे येथे राहणारा ताडीवाला रोड वस्तीमध्ये राहणारा प्रशांत कांबळे याला अखेर अटक करण्यात आली आहे. प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. प्रशांत गेल्या 15 वर्षांपासून बेपत्ता होता.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रशांत कबीर कला मंचाच्या संपर्कात आला होता. यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये घरात कामाला जातो असे सांगून निघून गेला आणि परतलाच नाही. यानंतर जानेवारी 2011 मध्ये कुटुंबाने प्रशांतची पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

एटीएसने 2011 च्या काळात संशयित माओवादी अँजेलो सोनटक्केला ठाणे येथून ताब्यात घेतले होते. अँजेलोचे पुण्यातील काही सक्रिय सहकारी आणि कबीर कलामंचाच्या काही कलाकारांना नक्षलवादाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. या सर्वांवर माओवादीचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एटीएसच्या तपासामध्ये बेपत्ता झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोघेजण माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले होते. यामुळे दोघांना फरार आरोपी दाखवण्यात आले होते. याशिवाय दोघेही माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसह काम करत असल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर वर्ष 2021 नोव्हेंबरमध्ये तेलतुंबडे गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला हता. तसेच संतोश शेलारला वर्ष 2024 मध्ये पुण्यात घरी आला असता एटीएसकडून अटक केली होती.

आता प्रशांत कांबळेला एटीएसकडून अटक करत ठाणे युनिटच्या ताब्यात दिले आहे. प्रशांतला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कंप्युटर दुरुस्तीच्या कामात तरबेज असल्याने प्रशांतला लॅपटॉप असे नाव दिले होते.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!