Nawab Malik Money Laundring Case Breaking News : नवाब मलिक यांना दिलासा!, जामिनावर मिळाली 2 आठवड्यांची मुदतवाढ

Nawab Malik Money Laundring Case News : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 12, 2024 8:57 AM IST

Nawab Malik Money Laundring Case News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. शुक्रवारी नवाब मलिक यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडून जामीनावर मुदतवाढ मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

नवाब मलिक यांच्या या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामिनाला आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. २०२२ मध्ये कथित गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ते आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आले होते.

नवाब मलिक यांनी कोणाला केलं मतदान?

दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीलाही हजेरी लावली होती. शुक्रवारी विधानभवनात दाखल होत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे मलिक यांनी नेमके मतदान कुणाला केले? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालंय.

आणखी वाचा :

Maharashtra Vidhan Parishad Election : गणपत गायकवाडांच्या मतदानावरुन अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

बच्चू कडू हे विधानपरिषदेत कोणाला करणार मतदान? प्रहार पक्षाचे मतदान 'याच' उमेदवारांना मिळणार

 

Share this article