Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात

Published : May 19, 2026, 11:07 AM IST
Karnataka Govt releases Rs 81 crore for PU exam expenses Eligibility test schedule for High School teachers announced rav

सार

Maharashtra Board Supplementary Exam 2026 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra Board Supplementary Exam 2026 : फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत अपयशी ठरलेल्या किंवा अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. जून-जुलै महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, 16 जूनपासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांना आणखी एक संधी मिळावी, या उद्देशाने मंडळाने परीक्षा नियोजन पूर्ण केले आहे.

बारावीची परीक्षा 8 जुलैपर्यंत

राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार, बारावीची पुरवणी परीक्षा 16 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होणार असून, 17 जूनला हिंदीचा पेपर घेतला जाणार आहे. त्यानंतर 18 जूनला मातृभाषेचा पेपर होईल. विविध शाखांच्या विषयांच्या परीक्षा सलग सुरू राहून 8 जुलैपर्यंत पूर्ण होणार आहेत.

दहावीची परीक्षा मराठीच्या पेपरने सुरू

दहावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा देखील 16 जूनपासून सुरू होणार असून पहिला पेपर मराठी विषयाचा असणार आहे. राज्यभरातील हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून 30 जूनपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

श्रेणी सुधार योजनेअंतर्गतही संधी

केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर कमी गुण मिळाल्याने असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेत सहभागी होता येणार आहे. अनेक विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देत आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांसाठी दुसरी मोठी संधी मानले जात आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आधीच सुरू

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून आपली परीक्षा निश्चित केली आहे. मंडळाने विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध वेळापत्रकच अंतिम मानण्याचे स्पष्ट केले आहे.

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर फिरणाऱ्या अप्रमाणित वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाइटवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे मंडळाने स्पष्ट केले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक