उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?

Published : May 18, 2026, 08:00 PM IST
Uddhav Thackeray

सार

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विकासकामांसाठी ही भेट असल्याचे सांगितले जात असले तरी, आष्टीकर शिंदे गटात जाणार का यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नव्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत झालेल्या या भेटीनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांनी अचानक शिंदेंची भेट घेतल्याने ते शिंदे गटात जाणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

आष्टीकर समर्थक काय म्हटले? 

दरम्यान, या भेटीमागे विकासकामांचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे. मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्न आणि निधी संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचं आष्टीकर समर्थकांकडून सांगितलं जात आहे. मात्र राजकीय जाणकार या भेटीकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने यापूर्वीही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या गटात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.

अधिकृत प्रतिक्रियाच नाही आली 

ठाकरे गटाकडून मात्र या भेटीवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण पक्षातील काही नेत्यांनी ही केवळ शासकीय कामासाठी झालेली भेट असल्याचं सांगितलं आहे. तरीही सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये या भेटीची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का, याबाबतही चर्चा सुरू झाली असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बैल कापला तर आम्ही, संग्राम जगताप यांनी दिला मोठा इशारा
ST Bus Fare Hike : डिझेल दरवाढीचा ST महामंडळाला फटका; बसभाडे वाढीचे संकेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य