
Chandrapur: वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. जिल्हातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या शेगाव बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. या घटनेने समाजमान सुन्न झाले आहे. गुलाब पत्रुजी दातारकर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभय गुलाब दातारकर याला अटक केली आहे.
गुलाब पत्रुजी दातारकर (वय ५८) हे घरी निवांत बसले होते. त्याचवेळी त्यांचा मुलगा अभय हा कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यावेळीच त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला. घरात अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक आले आणि त्यांना अभयाचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
पोलिसांनी मुलगा अभय याला अटक केली आहे. शेगाव पोलिसांनी घटनेची माहिती समजल्यानंतर तातडीने घरी धाव घेतली आणि मुलाला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण वरोरा तालुका ढवळून निघाला आहे. आपल्या जन्मदात्या वडिलांवरच मुलाने हल्ला केल्यामुळे बाप आणि मुलाचे नाते कुठं चाललं आहे हा प्रश्न सर्वांनाच पडत चालला आहे.
सध्याच्या काळात मुलांमध्ये आई वडिलांबद्दल राग येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. हा राग आल्यामुळं ते अनावर होतात आणि आई वडिलांवर हात उचलायला मागे पुढे पाहत नाही. त्यामुळं त्यांना योग्य वेळी उपचार मिळणं आवश्यक असल्याचं दिसून येत आहे.