Mumbai Weather: कोकणात पावसाचा जोर वाढणार; मुंबईत ढगाळ वातावरण राहणार

Published : Jul 20, 2025, 11:20 AM IST
Heavy Rain Alert

सार

कोकण किनारपट्टीसह इतर ठिकाणी पाऊस काही प्रमाणात थांबला असला तरी आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Weather: कोकण किनारपट्टीसह इतर ठिकाणी पाऊस काही प्रमाणात थांबला आहे. काल पाऊस काही काळ थांबला असला तरीही आज ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळं आज पावसाच्या सरी काही प्रमाणात पडण्याची शक्यता असून दमट हवामानामुळे उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई शहरात राहणार ढगाळ वातावरण 

मुंबई शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे.

ठाणे आणि नवी मुंबईत पावसाचे प्रमाण वाढणार 

ठाणे आणि नवी मुंबईत पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. सकाळी वातावरण उबदार राहणार असून दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं गाडी चालवताना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.

पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार 

पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळं मच्छिमारांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काही भागांमध्ये संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे.

कोकणात चांगला पाऊस होणार 

कोकणातील पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता असून, हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज दिवसभर या भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. किमान तापमान सुमारे २४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सखल भागांत पाणी साचण्याची तसेच दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!